Mr Shivaji Arjun Shinde founded the Aashirvaad Trust as an NGO in the year 2020. The organization helps underprivileged children by providing them food, shelter, education and opportunity to grow their personalities.
The trust is currently taking care of around 25 children at its Gurukul Hostel. This hostel is located at Kasari Phata, Kondhapuri in the Pune district of Maharashtra state.
संस्थापकाकडून प्रेरणा शब्द…
“अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर”
– बहिणाबाई चौधरी
दारिद्र्याची सर्वोच्च सीमा भटक्या जमातीच्या वाट्याला आहे. पालाच्या असऱ्याला उन्हा,तान्हात, पावसात भिजून, वेगवेगळी सोंगे घेऊन, भिक मागून उदरनिर्वाह करण्यासाठी भटका समाज एका ठिकाणी राहत नाही पर्यायाने मुलांना शिक्षण घेता येत नाही आधीच गरिबी त्यात कुणाची आई ,कुणाची वडील, नसतात अशा अवस्थेत मुलांची शिक्षणाची गैर असे होती त्यामुळे या मुलांना इच्छा असूनही शिक्षण न घेता भटकंती करावी लागते..
कार्याबद्दल
श्री शिवाजी अर्जुन शिंदे हे ही गरिब समाजामध्ये उदरनिर्वाह करत असताना घरच्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये उंब्रज ता.कराड जिल्हा सातारा या गावी आश्रम शाळांमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतले पुढे आपण हि गावो गावी भटकंती तसेच इतर समाजातील गरीब अनाथ निराधार मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व शिक्षणापासून वंचित असणाऱ्या गरीब मुलांसाठी कार्य करण्याचा संकल्प मनात ठाम घेतला .
या अनुषंगाने 8 ऑक्टोबर 2020 या दिवशी आशीर्वाद ट्रस्ट नावाची संस्था स्थापन करून गुरुकुल वसतिगृह नावाचे आश्रम उदयास आणले .
कुठल्याही आर्थिक, सामाजिक ,मदतीची वाट न पाहता बँकेतून पर्सनल लोन तसेच पीएफ काढून ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.आशा वेळू गरीब ,निराधार, अनाथ मुलांचा शोध घेऊन या मुलांना हक्काचा निवारा व दर्जेदार शिक्षण मिळण्याचा प्रयत्न सुरू झाला.. हळूहळू गरजू मुले येऊ लागली व राहू लागले आणि शिकू लागले.
या गुरुकुल वस्तीग्रह आता राहणाऱ्या गरजू व गरीब मुलांची संपूर्ण जबाबदारी संस्थेमार्फत घेतले जाते संस्थेमार्फत या मुलांना शिक्षणाबरोबर अन्न ,वस्त्र, निवारा ,कपडे इतर सर्व गरजा संस्थेमार्फत निशुल्क पुरविण्यात येतात. शिक्षणाबरोबर या मुलांना स्वयंशिस्त, स्वावलंबीपणा, निटनेटकेपणा हे गुण अंगीकृत करताना दिसत आहे त्याचबरोबर मुलांना क्रीडा, संस्कृती व बौद्धिक उपक्रमही गुरुकुल वस्तीगृह मार्फत दिले जात आहे.
संस्थेचे धोरण
गावोगावी भटकंती करणारा भटक्या-विमुक्त समाजातील व इतर गरीब निराधार अनाथ मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची मुख्य काम करण्याचे संस्थेचे धरून आहे तसेच या आशीर्वाद ट्रस्टमार्फत गावोगावी भटकंती करणाऱ्या भटक्या-विमुक्त समाजामध्ये जनजागृती तसेच या उपक्रमांवर आदर्श स्त्री पुरस्कार ,पर्यावरण संवर्धन जागृती, निराधार स्त्रिया व वृध्दासाठी घरबांधणी , गुरांसाठी गोठा यासारखे उपक्रम वेळेवेळी घेण्यात येणार आहे.
तरी समाजातील दानशूर लोकांना आवाहन केले जाणार जात आहे की या पवित्र कामासाठी तुम्ही गहू, तेल, तांदूळ, कपडे, वह्या, पुस्तके अशा प्रकारची मदत करून सहकार्य करावे.
Vision
The children from nomadic and poor communities are deprived of education. The trust has the vision to bring them into the stream of education. Along with education, the trust aims to help them develop other skills and provide them with the right to shelter.